आनुवंशिक अँजिओइडिमा (HAE) वर कसा उपचार करतात?

 

आपल्या डॉक्टरांशी बोलताना आनुवंशिक अँजिओइडिमा (HAE) च्या विविध उपचार पर्यायांबद्दल विचारल्यास साहाय्य होऊ शकेल. या पर्यायांमध्ये प्रतिबंधक आणि त्वरित उपलब्ध चिकित्साही समाविष्ट आहेत.

 

HAE प्रतिबंधात्मक उपचार

HAE प्रतिबंधक उपचारांना रोगनिरोधनाचे उपचार असेही म्हणतात. यात कमी संख्येने आणि कमी तीव्रतेचे प्रकोप होण्यास आपल्याला साहाय्य होण्यासाठी औषधे नियमितपणे घेण्याचा समावेश आहे.

HAE साठी त्वरित उपचार

HAE चे त्वरित उपलब्ध उपचार म्हणजे HAE च्या प्रकोपाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरलेले औषध. त्याला तीव्र उपचार असेही म्हणतात.

 

HAE असलेल्या प्रत्येकच व्यक्तीला श्वसनमार्गावर परिणाम करणारा प्रकोप होईल असे नाही, परंतु तो धोका मात्र असतो. हे प्रकोप प्राणघातक असू शकतात, त्यामुळे आघाडीच्या आरोग्य संस्था शिफारस करतात की HAE असलेल्या प्रत्येकच व्यक्तीला त्वरित उपलब्ध चिकित्सा उपलब्ध असल्या पाहिजेत. आपल्याला जर HAE असेल, तर आपल्या डॉक्टरांशी त्वरित उपलब्ध उपचारांबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे.

 

माहीत असलेले बरे

HAE लोकांवर इतक्या विविध पद्धतींनी परिणाम करू शकतो, त्यामुळे आपल्या डॉक्टरांशी जवळून सहकार्य करून आपल्यासाठी सर्वथा योग्य अशी एक उपचार योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.