निदान करुन घेण्याची सुरुवात आपल्या डॉक्टरांशी बोलण्यापासून होते. आनुवंशिक अँजिओइडिमा (HAE) हा क्वचित दिसणारा आजार असल्यामुळे आपल्या डॉक्टरांसहित फार थोड्या लोकांनी त्याबद्दल ऐकलेले असते. किंबहुना अनेक डॉक्टरांना एखादा HAE चा रुग्ण कधी दिसणारही नाही. त्यामुळेच अचूक निदान होणे आव्हानात्मक असू शकते.
आपल्या डॉक्टरांच्या नियोजित भेटीमध्ये’ कशाची अपेक्षा करावी
आपल्या डॉक्टरांच्या नियोजित भेटीमध्ये’ कशाची अपेक्षा करावी
जर आपल्या डॉक्टरांना वाटत असले की आपल्याला HAE असू शकेल, तर ते आपल्याला विचारण्याची शक्यता असते, की आपली लक्षणे कोणती आणि ती केव्हापासून आपल्या लक्षात येऊ लागली. HAE हा बहुधा नातेवाईकांकडून पुढच्या पिढ्यांमध्ये उतरत असल्यामुळे आपले डॉक्टर बहुधा असेही विचारतील की आपल्या परिवारापैकी कोणाला सूजेच्या घटना होतात का किंवा HAE असल्याचे निदान झाले आहे का.
आपल्या परिवारात HAE कोणालाही नसला तरी तो आपल्याला होऊ शकतो. HAE च्या दर चारपैकी एक केस जनुकामध्ये आपोआप सदोष बदल झाल्यामुळे होते.
आपल्याला HAE असू शकतो असे आपल्याला वाटत असल्यास, आपली लक्षणे नोंदवण्यासाठी ही चर्चा मार्गदर्शिका डाउनलोड करा आणि आपल्या डॉक्टरांशी संभाषण सुरू करा.
HAE च्या निदानाची पुष्टी करणाऱ्या चाचण्या
जर आपल्या डॉक्टरांना वाटत असले की आपल्याला HAE असू शकेल, तर या निदानाची पुष्टी करण्यासाठी अनेकदा एक रक्ताची चाचणी वापरली जाते. तीमध्ये आपल्याकडे किती C1-INH प्रोटीन आहे हे मोजले जाते. ते इतर माहितीसुद्धा पाहतील, जसे आपली लक्षणे, ती काही विशिष्ट औषधांना कसा प्रतिसाद देतात आणि तुमचा पारिवारिक इतिहास.